पुणे स्टेशन येथे शनिवारवाडयाची प्रतिकृति
3/12/2019, पुणे – पुणे रेलवे विभागाने पुण्याचा ऐतिहासिक वारसा शनिवारवाडयाची सुंदर व आकर्षक प्रतिकृति पुणे रेलवे स्टेशन च्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ स्थापित केली आहे.
पुणे शहराच्या इतिहासात तसेच संस्कृति मध्ये शनिवारवाडयाचे विशेष महत्त्व आहे . स्टेशन वर शिल्पकला स्वरूपात साकारलेली ही प्रतिकृति सर्व लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. ही ऐतिहासिक प्रतिकृति पाहून प्रवासी देखील सहजच सेल्फी घेण्याचे पसंत करत आहेत.
या पूर्वी पुणे रेलवे स्टेशनच्या ताडीवाला रोड साईड सेकंड एंट्री जवळ आषाढी वारी ची झलक दाखवणारे शिल्प स्थापित केले गेले आहे. या शिल्पा मध्ये 6 लोकांच्या समूहास अभंग गात , ध्वजा फडकावत मार्गस्थ होताना दाखविले आहे. अशा प्रकारे पुणे स्टेशन हे पुणे शहराची सांस्कृतिक परंपरा दर्शवित आहे. या दोन्ही सुंदर प्रतिकृतिनां मंडल रेल प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी पूर्ण रुप दिले आहे .