लिफ्टमधून अडकलेल्या परदेशी इसमाची सुखरुप सुटका

18/10/2019, पुणे – काल रात्री 12 वाजता उंङ्री, शांतिकुंज सोसायटी येथे चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये टांझानियाचे रहिवाशी असलेले 37 वर्षीय जॉन मोजो हे अर्धा तास अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे अडकेलेल्या स्थितीत होते. स्थानिकांनी प्रयत्न करुन देखील लिफ्ट सुरू होत नाही हे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात वर्दी देण्यात आली.
कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन टेरेसवरील लिफ्ट कॅट्रोल केबिनमध्ये जाऊन विदूयत पुरवठा बंद करून अग्निशमन उपकरणांचा वापर करीत अडकलेल्या परदेशी इसमाची 10 मिनिटात सुखरूप सुटका केली. त्यानंतर घाबरलेल्या त्या इसमाने जवानांचे खूप आभार मानले.
या कामगिरी मधे केंद्रप्रमुख – प्रकाश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन कैलास शिंदे, रफिक शेख , शंकर नाईकनवरे , राहुल जाधव, सुरज यादव, प्रदीप कोकरे यांनी सहभाग घेतला.