पुणे : 10 वी,12 वी विद्यार्थ्यांचा सॅक बॅग, पेन सेट व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
पुणे कॅन्टोन्मेंट, 18/8/2019 : भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुणे कॅन्टोन्मेंट चे माजी उपाध्यक्ष,माजी नगरसेवक मा.करणसिंग मकवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी 10 वी,12 वी विद्यार्थ्यांचा सॅक बॅग, पेन सेट व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप अखिल भारतीय सफाई मजदूर काग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री मा.सुधाकरणजी पनीकरण दास,स्व. सिमा जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे मा शांताराम जाधव,विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त,युग फाउंडेशनचे मा.कनव चव्हाण, एशियन ट्रेडर्स चे चांदभाई यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला दलितमित्र मोतीलाल निनारीया, दलितमित्र सुदाम लोखंडे, विलास वनशिव फुलसुंदर महाराज श्री हजारे तसेच नवल सेवा प्रतिष्ठान चे बलराम लखन, रूपचंद चव्हाण, राज सोलंकी, कामगार नेते मेवालाल चव्हाण, भोलेश्वश भगत, प्रेमराज जाधव, मनोज सरोदै, श्रीकांत कांबळे,युग फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल जेधे,गोपी कसोटी, सिद्धान्त सारवान,प्रतिक्षा चरण,चित्रपट मुळशी पॅटर्न, संभाजी सिरीयल फेम अभिनेता श्री शिवाजी खुडे, राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त दिपक निनारीया उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष मा. स्विकृत नगरसेवक विनोद निनारीया, राष्ट्रीय मजदूर काग्रेस ससुन युनिट चे अध्यक्ष प्रमोद निनारीया यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिक निनारीया, प्रथमेश सोलंकी, जार्ज डेव्हिड, फादर राजू बारसे, परेश चव्हाण, गणेश भंडारे यांनी परीश्रम केले.