खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीचे शिवसैनिकांकडून ढोल-ताशाच्या गजरात स्वागत

Share this News:

खासदार बारणे यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांचा जल्लोष

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना जाहीर होताच शिवसैनिकांनी ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष केला. फटाके वाजवून, पेढे वाटून आंनदोत्सव साजरा केला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्याच यादीत खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली. आकुर्डीतील शिवसेना भवन येथे शिवसैनिकांनी एकत्र येत उमेदवारीचे स्वागत केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सल्लागार मधुकर बाबर, पिंपरी संघटक जितेंद्र ननावरे, सरिता साने, अनिता तुतारे, नाना काळभोर,  रोमी संधु, ज्ञानेश्वर शिंदे, तामिनी मिश्रा, कल्पना जाधव, उषा आल्हाट, शैला पाचपुते, शर्वरी जळमकर, मंगला भोकरे, भाग्यश्री म्हस्के, वैशाली कुलथे, विजया चव्हाण, विद्या जाधव, बाळासाहेब वाल्हेकर, दिलीप भोंडवे, बबलू शेखर, सोनू संधू, किसन शेलार, केशव सरोदे, रमेश जावळे, पोपटराव गाडगे, बाऴकृष्ण चिले, राजेंद्र रणदवणे, एस.आर. जाधव, दिलीप सावंत, दिपक साळुंके, चंद्रकांत अरडक, नारायण माने जल्लोषात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या एकविरादेवी आणि जग्‌दगुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी माथा टेकविला आहे. मावळ ही संताची भूमी आहे. आज सकाळीच प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यानंतर सायंकाळी उमेदवारी जाहीर झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानत आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून मावळवर पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकाविण्यासाठी मी सज्ज आहे. गेल्या पाच वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघात केलेले काम, त्याचबरोबर जनतेशी झाले एकरुप या माध्यमातून संपूर्ण मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. 2019 च्या निवडणुकीत मी नक्कीच विजयी होईल.

”जय भवानी, जय शिवाजी”, ”आवाज कोणाचा शिवसेनेचा”, ”कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”,पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुमारे साथ है”, ”येऊन येऊन येणार कोण आप्पाशिवाय आहेच कोण” अशा जोरदार घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.