सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यास बेदम मारहाण, मावळचं राजकारण तापलं
तळेगाव दाभाडे, 6/9/2019: मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या सुनील शेळके यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याला काळ रात्री वराळे येथे मोटारीतून आलेल्या काही तरुणांनी पाईप व लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तो कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्पेश मराठे असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कार्यकत्याचे नाव आहे. मराठे यांचे दोनही पाय एक हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . मारहाण करणाऱ्यांमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समाविष्ट असल्याने मावळचे राजकारण चांगलेच तापले आहे.
सुनील शेळके यांनी या प्रकरणी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर आरोप केला असून मावळचे जनता दादागिरी व दडपशाही खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. निवडणूक लोकशाही मार्गाने व प्रेमाने लढावी. असे आवाहनही शेळके यांनी केले.
राज्यमंत्री बाळा भेगडे त्यांनी शेळके यांचे आरोप फेटाळून लावले असले तरीही भेगडे यांचा खालावत चाललेला मावळवासीयांचा प्रतिसाद आणि सुनील शेळके यांना मिळत असलेला उत्स्फूर्त पाठींबा यामुळेच हा गंभीर मारहाणीचा गुन्हा घडल्यासह बोलले जात आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव येऊ नये यासाठी उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.