‘टीव्हीएस मोटर्स’कडून टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स ऑटोरिक्षा सादर
पुणे : “ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटार्स लिमिटेड कंपनीच्या वतीने नवीन वैशिष्ट्यपुर्ण २२५ सीसी क्षमतेचे लिक्वीह कुल्ड इंजिन असलेली ‘टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स ऑटोरिक्षा’ ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे. नव्या भारताची नवी रिक्षा अशी या ऑटोची ओळख निर्माण झाली आहे. अधिक शक्तिशाली, वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे,” अशी माहिती टीव्हीएस मोटर्सचे सहायक सरव्यवस्थापक (महाराष्ट्र) शिवानंद लामदाढे यांनी दिली.
विमाननगर येथील हॉटेल हिंदुस्थान इंटरनॅशनल येथे टीव्हीएस मोटर्सच्या वतीने या टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स रिक्षाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानांतर पत्रकारांशी संवाद साधताना लामधाडे बोलत होते. याप्रसंगी टीव्हीएस मोटर्स विभागीय व्यवस्थापक सौरव घोराई, श्रीगणेश ऑटोचे राजूभाई दीक्षित, शाह आटोचे हरून शाह, सार्थक ऑटोचे सुनील बर्गे, टीव्हीएस मोटर्सचे अरुण तिवारी, मणिंदर सिंग आदी उपस्थित होते.
शिवानंद लामदाढे म्हणाले, “दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये टीव्हीएस एक अग्रणी आणि नामांकित कंपनी आहे. आजवर दर्जेदार वाहनांचे वितरण कंपनी करत आली आहे. टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्सच्या रूपाने आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त रिक्षा बाजारात आणली आहे. यामध्ये वाहनचालक आणि ग्राहकांसाठी अति उत्तम गती आणि शक्तीक्षमता आहे. आरामदायक बैठक क्षमता, उत्तम सस्पेन्शन आणि अधिक मायलेज देण्यात आले आहे. टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स २२५ सीसीचे इंजिन आहे. तसेच भरपूर कालावधीसाठी वापर आणि उच्च मायलेज (इंधनक्षमता जास्त आहे.) ही ऑटोरिक्षा सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोल या तीनही प्रकारांत उपलब्ध आहे. पुण्यात मात्र केवळ सीएनजी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.”
“टीव्हीएस मोटार कंपनी वाहन निर्मिती व्यवसायात अतिशय उत्कृष्ठ दर्जाची दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी व वाहनांच्या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर कार्यरत असलेली कंपनी आहे. १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल कंपनी दरवर्षी करत आहे. जगातील ३० पेक्षा जास्त देशांना या वाहनांची निर्यात केली जाते. टीव्हीएस किंग आज भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पसंतीला खरी उतरलेली असून, त्याचा स्विकार संपूर्ण जगात झालेला आहे. मागील १० वर्षापासून कंपनीने १० लाखापेक्षा जास्त ३ चाकी वाहनांची विक्री केली आहे. सध्या कंपनी भारतामधील १०० विविध शहरांमध्ये आणि जगभरातील ३० देशांमध्ये वाहनांचे सुटे भाग आणि आवश्यक सेवा पुरवित आहे,” असेही लामधाडे यांनी नमूद केले.
टीव्हीएस किंग इयुरेमॅक्सची किंमत रु. २,००,१३०/- (सर्व खर्चासह) आहे. श्रीगणेश ऑटो, स्वारगेट/दापोड़ी, शाह ऑटो, मंगळवार पेठ आणि सार्थक ऑटो, चिंचवड या अधिकृत डिलर्सकडे या आधुनिक रिक्षाची खरेदी आपल्याला करता येणार आहे. सोबतच ग्राहकांसाठी वाहन खरेदीकरिता आकर्षक कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
“अधिक शक्ती असणारे २२५ सीसी लिक्विड कुल्ड ड्युरेलाईफ इंजिन, सर्वोत्तम तंत्रज्ञान, उत्तम श्रेणी आणि क्षमता अधिक आहेत. घाटरस्त्यावर, शहरातील उंच पुलांवर ही रिक्षा सहज चालते. देखभालीचा कमी खर्च असून, वाहनाच्या प्रत्येक पार्टची क्षमता व आयुष्यमान जास्त आहे. तसेच वाहनांचे सुटे भाग योग्य किंमतीत बदलण्याची व्यवस्था आहे. वाहनाची १०,००० कि.मी. रनिंग झाल्यानंतर सर्व्हिस करण्याची गरज पडेल. त्यामुळे इंधन आणि सेवा खर्चाची बचत होईल. मोठे व पाणी प्रतिबंधक व सुरक्षित असणारे दोन उपयुक्त युटीलिटी बॉक्स, ५.८ लिटर स्टोरेज क्षमता, दैनंदिन वापराच्या वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त जागा, मोबाईल चार्जिगच्या स्वतंत्र सॉकेटची सोय यामध्ये करण्यात आली आहे,” अशी या नवीन रिक्षाची वैशिष्ट्य आहेत.