मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती लवकरच – सुभाष देसाई

Share this News:

 मुंबईदि. 29/7/2019 : मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या पुनर्विकसित इमारतींच्या प्रश्नी शासन गंभीर असून त्यांच्या पुनर्विकासाबाबत लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक तरतूद करण्यात येणार असून म्हाडा कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहेअशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तसेच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.           मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.

          मुंबईतील रेल्वेवरील पूल तसेच शहरातील विविध जुन्या पुलांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. म.न.पा. आयुक्तांनी शहरातील पुलांच्या कामाचा आढावा घ्यावातसेच पुलांच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची वेळ घेऊन रेल्वे विभाग आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट आदी विभागांची एकत्रित बैठक घ्यावीअसे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

          बैठकीत मुंबईतील रस्त्यांची कामेवाहतूक व्यवस्थापनवीजपुरवठापाणीपुरवठाआरोग्यशाळा इमारतीमच्छीमारफेरीवाल्यांचे प्रश्न आदी विषयी गेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पूर्ततेबाबत आढावा घेण्यात आला. श्री. देसाई यांनी प्रलंबिल असलेले विषय गतीने मार्गी लावावेतअशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.        

          या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना 2018-19 मधील खर्चाच्या अहवालास मान्यता देण्यात आली. 2018-19 च्या वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी 116 कोटी 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 115  कोटी 58 लाख रुपये खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 18 कोटी 76 लाख रुपयांची तरतूद आणि 11 कोटी 5 लाख रुपयांचा प्रत्यक्ष खर्च झाला आहे. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी (ओटीएसपी) 1 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद आणि 1 कोटी 39  लाख रुपये प्रत्यक्ष खर्च झाला आहे. या खर्चातील  मुद्द्यांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

          यावेळी श्री. जोंधळे म्हणालेजिल्हा वार्षिक योजना 1919-20 अंतर्गत सर्वसाधारण योजनेचा आराखडा 125 कोटी रुपयांचाअनुसूचित जाती उपयोजनेचा आराखडा 18 कोटी 76 लाख आणि ओटीएसपीसाठी 16 लाख 55 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा सर्व निधी मार्च 2020 पर्यंत खर्च पडेल यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात येईल.

          यावेळी आमदार सर्वश्री राज पुरोहितअजय चौधरीसदा सरवणकरकिरण पावसकरराहूल नार्वेकरमंगलप्रभात लोढाभाई जगतापॲड. वारिस पठाणसुनील शिंदेकॅ. आर. तमिल सेल्वनश्रीमती वर्षा गायकवाडबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशीजिल्हाधिकारी शिवाजी जोंधळेमनपाचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड, उपमहापौर श्रीमती हेमांगी वरळीकरबृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्यबेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडेएमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारेम्हाडाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळेमुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी शहाजी पवार आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.