अजमेरा कॉलनीतील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन; आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून होणार काम

Share this News:

पिंपरी, 20 ऑगस्ट – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून पिंपरीतील, अजमेरा कॉलनी येथील डी सेक्टर जागृती सोसायटी परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आजपासून रस्त्याच्या काम केले जाणार आहे.

 

यावेळी कार्तिक लांडगे, विक्रांत सरोदे, अमित परदेशी, सुरेश भोसले, बापू वाघेरे, आर.एन. शिंदे, अन्वर शेख, रघुनाथ मोरे, एस.डी. थोरवे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अजमेरा कॉलनी येथील डी सेक्टर जागृती सोसायटी परिसरातील रस्ता उखडला होता. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम राहिले होते. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना जाता-येता त्रास होत होता. आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना चांगला रस्ता वापरण्यासाठी मिळणार आहे.