केजे ट्रिनिटी शिक्षण संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदत रवाना
21/8/19, पुणे : कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी येवलेवाडी येथील केजेज ट्रिनिटी शिक्षण संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, कपडे, शालेय साहित्य आदी मदत पाठविण्यात आली. संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील आणि शाळेतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाकडून ही मदत गोळा करण्यात आली होती.
कायम सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत साहित्य गोळा करण्यात पुढाकार घेतला.