World Television premiere of Mr and Mrs Sadachari
मिस्टर अँड मिसेस सदाचारी चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर
मनोरंजनाची ‘फूल ऑन मेजवानी’ असलेले सिनेमे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. या पसंतीचा विचार करत झी टॅाकीजने मिस्टर अँड मिसेस सदाचारी सिनेमाची ट्रीट प्रेक्षकांसाठी आणली आहे. रोमॅंटिक, कॉमेडी आणि अॅक्शनचं ‘फूल ऑन पॅकेज’ असलेला मिस्टर अँड मिसेस सदाचारी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार ९ एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर रंगणार आहे.
मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा एका दाक्षिणात्य चित्रपटाचा मराठी रिमेक आहे. प्रेम जिंकण्यासाठी केलेल्या संघर्षावर आधारित या चित्रपटाची कथाअसून साऊथ स्टाईल अॅक्शन सीन्सची धमाल यातरसिकांना बघायला मिळणार आहे. अभिनेता वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, मोहन जोशी, प्रदीप वेलणकर, विजय आंदळकर, उमा सरदेशमुख,उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जवादे, अनुजा साठे आणि कांचन पगारे यांच्या भूमिका आहेत.
अॅक्शन आणि रोमान्सचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या मिस्टर अँड मिसेस सदाचारीचित्रपटाचा आस्वाद रविवार ९ एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर अवश्य घ्या.