‘आयसीएआय’तर्फे बुधवारी ‘टीडीएस’वर मागर्दशन सत्र
3 /8/19, पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) यांच्या वतीने ‘टीडीएस’वर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. येत्या बुधवारी (दि. ७ ऑगस्ट) सकाळी १० ते १ या वेळेत बिबेवाडी येथील आयसीएआय भवन येथे हे सत्र होणार आहे. मुख्य प्राप्तिकर आयुक्त अनुराधा भाटिया, पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त (टीडीएस) आदर्श मोदी, मुंबई प्राप्तिकर आयुक्त (१) व्ही. के. गुप्ता, प्राप्तिकर आयुक्त (२) प्रताप सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सत्रात स्वप्नील सावंत टीडीएसमधील तरतुदी, महादेवन टीडीएस कर कपात आणि पुरुषोत्तम वत्स ‘टीडीएस’मधील तांत्रिक अडचणी याविषयी बोलणार आहेत. सनदी लेखापालांसह टीडीएस संबंधित अडचणी असणाऱ्यांना नागरिकांना यामध्ये सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी www.puneicai.org या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
