एकदिवसीय त्रिसुत्री उपक्रमात लोणी काळभोरमध्ये 325 कामे

Mahavitaran-Logo
Share this News:

पुणे, दि. 14 जून 2019 : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या महावितरणच्या एकदिवसीय त्रिसुत्री उपक्रमात मोहिमेत लोणी काळभोर येथे 325 विविध कामे करण्यात आली आहेत. यासह लोणी काळभोरमधील पालखी मार्गावर वीज सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

मुळशी विभाग अंतर्गत लोणी काळभोर येथे गुरुवारी (दि. 13) एक दिवसीय त्रिसुत्री उपक्रमात रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तोडणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे क्लिनिंग व आवश्यक दुरुस्ती, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे, वीजतारांना स्पेसर्स बसविणे, गार्डींग करणे 286 कामे करण्यात आली. याशिवाय 27 वीजबिलांची दुरुस्ती करण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर 12 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले, उरळीकांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. प्रदीप सुरवसे, सहाय्यक अभियंता सर्वश्री गजानन मोरे, हाजी मलंग बागवान, निखील कोंडूरकर, संजय पोफळे, नईम सुतार आदींसह 75 जनमित्र व इतर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले.