शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी धरली निसर्गाची कास

IMG-20190806-WA0002
Share this News:
8/8/2019 : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे धोरण समोर ठेऊन जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या सामाजिक उपक्रम कक्षाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
हा उपक्रम मनशक्ती केंद्र, चाकण येथे सुमारे २०० झाडांचे वृक्षारोपण करून राबविण्यात आला, यावेळी मनशक्ती केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अजित फाफाळे यांनी मानवी मन व निसर्ग हे एकमेकास कसे पूरक आहेत याचे महत्व सांगून वृक्षांचे संगोपन करण्याचा संदेश दिला.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन व संगणक विभागप्रमुख डॉ. सीमा केदार यांनी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात संगणक विभागातील ९० विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. प्रा. ज्योती क्षीरसागर व प्रा. विजय कोतकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.