काश्मीर मधील ३७० वे कलम रद्द करा –  पनून काश्मीर ची मागणी

Share this News:

हिंदुस्तान सरकार आणि भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ निदर्शने व रक्तदान शिबिर संपन्न

 

काश्मिरातील परिस्थिती,आतंकवाद, फुटीरतावाद्यांच्या कारवाया यामुळे आम्हाला आमच्याच देशात निर्वासित म्हणून राहण्याची दुर्दैवी परिस्थिती ओढवली असून आम्हाला पूर्वीसारखाच शांत व भारताचे नंदनवन असलेला काश्मीर हवा आहे.अश्या शब्दात युथ फॉर बनून काश्मीर चे प्रमुख राहुल कौल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.पुण्यात राहणारया काश्मिरी पंडितांनी आज पुण्यातील बालगंधर्व चौकात भारत सरकार आणि दैन्यदलांच्या समर्थनार्थ निदर्शनांचे आयोजन केले होते. भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे,हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट,नगरसेविका मसुरी सहस्रबुद्धे,धिखं जनसेवा संघाचे चरणसिंग सहानी,दलजितसिंग रँक,सतीश गायकवाड इ यावेळी उपस्थित होते. पनून काश्मीर संघटनेचे रोहित  रवी भट,  काश्मिरी हिंदू सभेचे आर सी शिवपुरी, विमान सुम्बली,जगमोहन कौल,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या श्रीनगर व अमरनाथ यात्रेदरम्यान आलेले अनुभव कथन केले तसेच केंद्र सरकार निश्चित पणे  काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करेल असा विश्वास व्यक्त करतानाच सैन्य डाळ लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणतील  व फुटीरवाद्यांचा नायनाट करतील असा विश्वास व्यक्त केला. शाम  देशपांडे यांनी काश्मिरी जनतेसोबत शिवडेना कायम राहिली असून काश्मिरीयत जमहुरियत यांच्या त्रिसूत्रीतून काश्मीर   प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त केला. भारत माता कि जय,वंदे मातरम,देश के गद्दारो  को जुते  मारो सालो को,पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणांनी आसमंत दुमदुमले.