विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत एकता दौड संपन्न

पुणे दि.३१: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड मध्ये विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस शपथ’ दिली. त्यानंतर कौन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक- अलंकार चौक- जनरल वैद्य मार्गे पुन्हा कौन्सिल हॉल परिसर या मार्गाने एकता दौड संपन्न झाली.

या एकता दौड मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, उपवनसंरक्षक श्री नाईकडे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.