आंबेगाव मतदार संघ निवडणुकीच्या कामातील कर्मचाऱ्यांना आवाहन

पुणे, दि. १८: आंबेगाव (१९६) विधानसभा मतदार संघामध्ये ३३६ केंद्रे आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दि. २० ऑक्टोबर रोजी तंत्रनिकेतन अवसरी खुर्द येथे आणण्यासाठी एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, असे आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कर्मचाऱ्यांना आणण्याची वेळ दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० ही असून नेण्या-आणण्याचे ठिकाण व एसटी बसेसची संख्या पुढील प्रमाणे आहे. जुन्नर बस स्थानक-०५, खेड बस स्थानक-०५, शिरूर बस स्थानक-०८, हडपसर पीएमपीएमएल बस स्थानक-०२, भोसरी पीएमपीएमएल बस स्थानक-०३ एसटी बसेस राहतील.