Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

पुणे दि. 14:- महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह पुणे येथून वाहनाने कौन्सील हॉल,विधानभवन, पुणेकडे प्रयाण. सकाळी 9 वा. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिनानिमित्त मा. महामहिम राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. स्थळ: कौन्सिल हॉल, विधान भवन, पुणे.

सकाळी 10 वा. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये तसेच पुर्व उच्च माध्यमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा शासकीय गुणगौरव कार्यक्रम. स्थळ: पहिला मजला, जिल्हा परिषद कार्यालय, पुणे. दुपारी सोयीनुसार पुणे येथून वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

००००

राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

पुणे दि.14:-जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 16 ऑगस्ट 19 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुरंदर-हवेली मतदारसंघात राखीव. सायंकाळी 6 वाजता दवणेमळा जेजुरी, ता. पुरंदर जि. पुणे येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक. त्यानंतर मुक्काम सासवड, ता. पुरंदर, जिल्हा पुणे.

शनिवार दि. 17 ऑगस्ट 19 रोजी सकाळी 9.30 वाजता सासवड, ता. पुरंदर, जिल्हा पुणे येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता पुणे येथे आगमन. सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी 5 वाजता शनिनगर व आंबेगाव बुद्रुक ता. हवेली, जिल्हा पुणे परिसरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा. कार्यक्रमानंतर सोयीनुसार सासवड, ता. पुरंदर, जि. पुणेकडे मोटारीने प्रयाण. सासवड, ता. पुरंदर जि. पुणे येथे आगमन व मुक्काम.

रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पुरंदर-हवेली मतदार संघात राखीव. सायंकाळी 5.30 वा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथून मोटारीने भेकराईनगर, ता. हवेली, जि. पुणेकडे प्रयाण सायंकाळी 7 वाजता भेकराईनगर व गंगानगर, ता. हवेली, जि. पुणे परिसरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा. कार्यक्रमानंतर सोयीनुसार सासवड, ता. पुरंदर, जि. पुणेकडे मोटारीने प्रयाण व मुक्काम.

००००

राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमीत मल्लिक यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

पुणे दि.14:राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

‍ रविवार दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 12 वाजता मुंबई येथून पुणेकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता पुणे येथे आगमन. सोमवार दि.19 ऑगस्ट 2019 ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2019 रोजीच्या कालावधीत भिमा-कोरेगाव सुनावणी. शनिवार दि. 24 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3 वा. पुणे येथून मुंबईकडे प्रयाण.

0000