प्रसिध्द साहित्यिक , लेखक, संशोधक धर्मपाल कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन
प्रसिध्द साहित्यिक , लेखक, संशोधक धर्मपाल कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ५५ वर्षाचे होते . त्यांच्यामागेपत्नी , एक मुलगा , एक मुलगी व जावई असा परिवार आहे . त्यांनी लोकशाहीर , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे समग्र वाड्मयचे संपादन करून त्याचे तीन खंड प्रसिध्द केले होते . त्यांनी मृत्यकडून जीवनाकडे , शोध अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा , संक्षिप्त रूपांतर – भारतीय राज्यघटना , भारतरत्न राजीव गांधी , राज्यपाल सुशीलकुमार शिंदे आदी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे . अण्णाभाऊ साठे – आंबेडकर चळवळीचे वारसदार हा त्यांचा लेख प्रसिद्ध होता .प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व्यक्तित्व कार्य साहित्य हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते . दि पुणे पोस्ट्स टेलिकॉम सोसायटीच्यावतीने त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते . नाट्य चित्र कला अकादमीचा त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यिक पुरस्कार देखील मिळाला होता .
त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यावेळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते , पोस्टमन व अन्य मान्यवर उपस्थित होते .
लेखक, संशोधक धर्मपाल कांबळे यांनी अत्यंत परिश्रम घेऊन मार्केट यार्ड येथील पोस्ट आफिस मध्ये पोस्टमनची नौकरी करून स्वखर्चाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मृत्यूकडून जीवनाकडे यांच्या आत्मचरित्र तसेच शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्यांच्या निधनाने संशोधनाचे व चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले