महाराष्ट्र : दुष्काळी भागात उभारलेल्या चारा छावण्यात 10 लाख पशुधन

Share this News:

मुंबई, दि. 25 : राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात आतापर्यंत जनावरांसाठी एकुण 1 हजार 638 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.  यात  9 लाख 37 हजार 948 मोठे तर 1 लाख 15हजार 861 छोटे असे एकुण 10 लाख 53 हजार 809  पशूधन दाखल करण्यात आले आहे. या चारा छावण्यांसाठी आतापर्यंत 62 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. देशमुख म्हणालेबीड जिल्ह्यातील चारा छावण्यात सुमारे 3 लाख जनावरे ठेवण्यात आली होती. या जनावरांना टॅगिंग करण्यात आले होतेतरिही या भागात चारा छावण्यांमध्ये  गैरव्यवहार झाला असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला असल्यानेया भागातील चारा छावण्यांची चौकशी करण्यात येईल. पालघर मधील दुष्काळग्रस्त तालुक्यातून चारा छावणीसाठी प्रस्ताव आल्यास चारा छावणी उभी करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

या विषयावरील चर्चेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह सदस्य सर्वश्री जयंत पाटीलसुरेश धस आदींनी सहभाग घेतला.