स्वातंत्र्य दिना निमित्त 100 कोरोना मुक्त रिक्षांची पुणेकरांना भेट

Share this News:

पुणे दि. 17- परवा 15 ऑगस्टला देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन सर्वांनी साजरा केला . यंदा त्यावर कोरोना संकटाचे सावट आहे. मात्र अशी संकटेच व्यक्ती,समाज आणि व्यवस्था म्हणून आपली परीक्षा बघत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीच सर्वजण कोरोनाच्या संकटाशी एकजुटीने लढत आहेत. या लढाईला बळ मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिना निमित्त ही लढाई पुढे नेणारा ‘ कोरोना मुक्त रिक्षा ’ हा उपक्रम रिक्शा पंचायत सुरू केला. या उपक्रमातील रिक्षांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हिरवा झेंडा दाखवला .

यावेळी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितिन पवार म्हणाले, ” टाळेबंदी शिथिल झाल्यावर 1 ऑगस्ट 2020 पासून, सर्वांना प्रवासी सेवा देण्यासाठी ऑटो रिक्षा खुल्या झाल्या. आहेत. तरीही एकूण रिक्षांपैकी 25-30%च रिक्षा सध्या रस्त्यावर दिसतात. पण सकाळी 7-8 वा. प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर आलेल्या रिक्षा चालकांना दु.1 वाजला तरी 1ले भाडे(भवानी) न झाल्याचा व दिवसात 100ते 150 ₹ ही कमाई होत नाही, असा अनुभव येत आहे. याचे कारण लोकांमध्ये असलेली भिती. ही भिती घालवण्यासाठी आणि प्रवास करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ कोरोना मुक्त रिक्षा ’ कल्पना उपयोगी पडेल. म्हणून सुरवातीला अशा 100 कोरोना मुक्त रिक्षांचा ताफा रिक्षा पंचायत रस्त्यावर आणल्या आहेत. त्यांना पर्यावरण विषयात काम करणार्‍या परिसर व अॅक्सा या संस्थांनी सहकार्य केले. असेच सहकार्य शहरातील इतर संस्था, उद्योजक यांनी दिल्यास जास्तीत जास्त रीक्षा कोरोंना मुक्त रीक्षांमध्ये रूपांतरित करता येईल. ” . कोरोना मुक्त रिक्षात 1.चालक व प्रवासी यांच्या मध्ये पारदर्शक पडदा आहे. .2.प्रवासी चढताना व उतरताना रिक्षा निर्जंतुक करण्यासाठी रिक्षा चालकाकडे निर्जंतुकीकरण द्रव्याचा पंप दिला गेलाय . 3.रिक्षाचालकाकडे वैयक्तिक वापरासाठी सॅनिटायझर बाटली आहे.. 4.रिक्षा चालकाला मुखपट्टी (फेसमास्क) व फेसशील्ड दिले गेले आहे. 5.या रिक्षा वेगळ्या ओळखण्यासाठी रिक्षावर दर्शनी भागात कोरोना मुक्त रिक्षा या मथळ्याचे स्टिकर लावलेले आहे. मुखपट्टया व सनिटायजर युनिक एज्युकेशन फाउंडेशन या बचत गटांच्या शिखर संस्थे कडून घेवून महिलांच्या रोजगारालाही हातभार लावण्यात आला आहे. कांचन राहुल काडगी या रिक्षा चालकाच्या कन्येने इयत्ता 10 च्या परीक्षेत 98%गुण मिळवले.तिचा पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन रिक्षा पंचायतीच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी यावेळी सत्कार केला.

या वेळी राव म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर होणारा हा उपक्रम औचित्यपूर्ण व दिशादर्शक ठरेल. यामुळे मिशन बिगिन अगेन लाही बळ मिळणार आहे. रिक्षा चालकांसमोर टाळेबंदीच्या काळात खूप अडचणी निर्माण झाल्या. रिक्षा या शहराच्या जीवन वाहिन्या आहेत. म्हणून रिक्षा चालकांचे प्रश्न या आधी जिल्हाधिकारी या नात्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून अग्रक्रमाने सोडवले. विभागीय आयुक्त म्हणूनही त्यांच्या प्रश्नी आपण लक्ष घालू.