राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ जून रोजी कामगार मेळाव्याचे आयोजन.- मुनाफ हकिम
मुंबई – दि.13 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवार दि.१५ जून रोजी दुपारी २ वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे कामगार क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस मुनाफ हकिम यांनी दिली आहे.
बदलत्या परिस्थितीमध्ये केंद्र व राज्य सरकारने कामगार कायद्यात केलेल्या मोठे फेरबदलामुळे कामगारांपुढे निर्माण होणाऱ्या विष्यातातील अडचणी, संघटीत/ असंघटीत कामगार संघटना पुढील आव्हाने आदी विषयाबाबत या मेळाव्यामध्ये चर्चा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, आ.दिलिप वळसे-पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, माथाडी कामगार नेते आ.शशिकांत शिंदे, आ.नरेंद्र पाटील, नेफेटूचे अध्यक्ष यशवंत भोसले, राष्ट्रवादी कामगार विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.व्ही अकोलकर, राष्ट्रीय सरचिटणीस पिताबंर मास्टर, बेस्ट कामगार युनियनचे सरचिटणीस शंशाक राव आदी मान्यवर तसेच कामगार संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
राहणार आहेत.