6000 kg beef seized by Bajrang Dal in Pimpri

Share this News:

बजरंग दला कडून पिंपरी मध्ये 6 टन ( 6000 किलो ) गोमांस जप्त !

आज दिं. 29.5.2017 पहाटे 3: 00 वा पिंपरी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अहमदनगर येथून कुरेशी हॉटेल च्या मागच्या गल्लीतून गायी व बैल कापून मुंबई येथे त्यांचे मांस विक्रीसाठी टेम्पो नं . MH.03.CP.1630 मध्ये भरून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर गोरक्षकांनी जुना पुणे मुंबई रस्त्यावर साफळा रचून थांबविली व पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सर्व माहिती देऊन पोलिसांची मदत मागितली टेम्पो व चालक यांना पो स्टे येथे आणून पोलिसांनी ड्रायव्हर अब्दुल रहमान अति महंमद खान व क्लिनर अहसान महंमद इंद्राशी याच्याकडे चौकशी केली असता त्याने अहमदनगर येथून गायी व बैल कापून टेम्पोत भरून मुंबई येथील गनी भाई याच्याकडे घेऊन जात आहे असे सांगितले त्यानंतर पोलिसांच्या समक्ष पशुवैधकीय अधिकारी डॉ. श्री देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी गाडीची तपासणी केली गायी व बैलांचे मुंडकी , मोठे मांस व पाय दिसले. पिंपरी पोलीस स्टेशनचे श्री. आर.आर. ठुबल सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिस कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य दिले.आणि कासायांना सहकार्य करणाऱ्या शेतकाऱ्यासह गायी कापणारा , गोमांस विकत घेणारा गनी भाई , ड्रायव्हर व गाडी मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 चे कलम 5 ( क ), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करून शिवशंकर स्वामी ( मानद पशुकल्याण अधिकारी ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. यावेळी कुणाल साठे , अभिजित शिंदे , उपेंद्र बलकवडे , सचिन जवळगे , गौरव पाटील , श्रीकांत कोळी इ गोरक्षकांनी या कारवाईत सहभाग घेतला.