जलयुक्त शिवारच्या कामाची एसीबी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश

Share this News:

मुंबई, दि. 1 : जलयुक्त शिवाराच्या  कामाची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी  असे निर्देश सभापती रामराजे नाइक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. शुक्रवार दि.24 जून रोजी राखून ठेवलेल्या प्रश्नावर आज झालेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. जलयुक्त कामात गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करण्या संदर्भात सदस्या श्रीमती विद्या चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या अनुषंगाने जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता. आज या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी  करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

ReplyReply allForward