संगम घाटावर झोपलेल्या इसमाचा खुन करणाया दोघांच्या बंडगार्डन पोलीसांनी 12 तासांच्या आत आवळल्या मुसक्या

पुणे, 30/04/2020 – संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना नावाच्या विषानूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत तसेच महाराष्ट्र सरकारकडून घोषीत करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दल बंदोबस्तामध्ये व्यस्त आहेत. दि. 29/04/2020 रोजी सकाळी आरटीओ चौकाजवळील संगम घाटावरील पार्कींगच्या जागेत एका इसमाची बॉडी पालथी असून त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झालेला असल्याची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या बॉडीची प्रथम ओळख पटत नव्हती. वरिष्ठांनी तपास पथकास योग्य त्या सुचना देऊन मार्गदर्शन केले.

 

त्याप्रमाणे तपास पथकाने तपासाची सुत्रे फिरवून मयत बॉडीची आजूबाजूच्या नागरीकांकडे विचारपुस करुन ओळख पटविली असता त्याचे नाव- मंगेश विष्णू कांबळे, रा. मंगळवारपेठ, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. मंगेशच्या आई व भाऊ यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मंगेश नशापाणी करीत असल्याने आमच्याबरोबर राहत नव्हता. तो कोठेही काम करुन कोठेही राहत असे. त्याचा राहण्याचा ठावठिकाणा नव्हता. संगम घाटावर नशापाणी करणारे व फिरस्ते यांच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता मंगेश याची काल 28/04/2020 रोजी संगम घाट येथे दोन तीन इसमांसोबत भांडणे झाली असल्याची माहिती मिळाली.

सदर माहितीच्या अनुषंगाने तपास पथकातील कर्मचारी निखील जाधव यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत सदर इसमांची माहिती मिळाली. त्यानुसार त्यामधील एक इसम ताडीवाला रोड भागातील नदीकिनारी येथे असल्याची बातमी मिळाली सदर ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जाऊन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाकडे अधिक चौकशी करता एक इसम नदीपात्रातील बेटामध्ये असल्याचे सांगितले त्याप्रमाणे नदीपात्रातील बेटांमध्ये लपलेल्या एका इसमास सापळा लावून ताब्यात घेतले. सदर दोन्ही इसमांची नावे निखील उर्फ भैय्या दिगंबर कांबळे, रा. ताडीवाला रोड, पुणे व प्रदिप उर्फ गोट¬ा गोरख कटारनवरे, वय-25 वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे अशी असल्याचे समजले. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर त्यांना सदरच्या गुन्ह्रामध्ये अटक केली आहे. त्यांचेकडे घटनेबाबत अधिक चौकशी करता त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


सदरची कारवाई परिमंडळ 2 चे पोलीस उप-आयुक्त शिरीष सरदेशपांडे, लष्कर विभागाचे सहा. पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांचे मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. दिगंबर शिंदे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे, निखिल जाधव, गौरव उभे, सागर जगताप, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, रुपेश पिसाळ, किरण तळेकर, हरीष मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Support Our Journalism Contribute Now