दुकाने खुली ठेवण्याबाबतच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशा बाबत स्पष्टीकरण

Share this News:

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2020: लॉक डाऊन संदर्भातल्या एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्वांमधे सुधारणा करत दुकाने खुली ठेवण्याबाबत, केंद्रीय गृहमंत्रालयाने काल आदेश जारी केला आहे. हॉटस्पॉट प्रतिबंधीत क्षेत्रात दुकाने बंदच राहणार

या आदेशानुसार –

  • ग्रामीण भागात शॉपिंग मॉल मधली दुकाने वगळता सर्व दुकाने खुली ठेवण्याची परवानगी आहे.

एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्वात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाने शहरी किंवा ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या भागात, वरील निर्देश केलेली दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी नाही.

  • शहरी भागात सर्व एकल दुकाने, आसपासची दुकाने आणि निवासी संकुलातली दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी आहे. बाजारपेठा, बाजारपेठ संकुल आणि शॉपिंग मॉल मधली दुकाने खुली ठेवण्याची परवानगी नाही.

ई वाणिज्यिक कंपन्यांना अत्यावश्यक वस्तू विक्रीची दिलेली परवानगी सुरु राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड-19 व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय  निर्देशात नमूद केल्याप्रमाणे, मद्य आणि इतर वस्तूंच्या विक्रीसाठीची मनाई जारी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आदेश जारी करून त्यांच्या  दुकाने आणि प्रतिष्ठाने कायद्या अंतर्गत नोंदणीकृत सर्व दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. निवासी संकुलातली दुकाने, नजीकची आणि एकल दुकाने यांचा यात समावेश आहे. लॉक डाऊनच्या नियमातली ही शिथिलता हॉट स्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू नाही याची दखल  घेणे महत्वाचे आहे.

 

ही परवानगी महानगर पालिका आणि नगर पालिका हद्द सोडून, बाजारपेठ संकुलातली दुकाने खुली ठेवण्यासाठी आहे. एकलमॉल आणि बहुविध ब्रान्ड मॉल मधली दुकाने कोठेही उघडण्याची परवानगी नाही.  परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांनी केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांसह दुकाने खुली ठेवायची आहेत तसेच मास्क वापरणे अनिवार्य असून सोशल डीस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे.