पर्यावरण रक्षणात भारताने आघाडी घेतल्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन

Share this News:

मुंबई, 29 सप्टेंबर 2019 : देशात 2 ऑक्टोबरला ‘फिट इंडिया प्लॉगिंग रन’ आयोजित करण्यात येणार आहे. प्लॉगिंग म्हणजे, धावता-धावताना कचरा उचलणे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अनोखा उपक्रम असल्याचे त्यांनी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात सांगितले. प्लॉगिंग सुरु करणाऱ्या रिपुदमन बेल्वी यांच्याशी आपली चर्चा झाली. त्यादरम्यान त्यांनी या अनोख्या उपक्रमाविषयी सांगितल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या ‘एकता दौड’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा उपयोग टाळण्याची गरज अधोरेखित करुन संपूर्ण जग भारताकडे- आदर्श म्हणून पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षणात भारताने आघाडी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले. एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठीच्या मोहीमेत जनता सहभागी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोग्यवान भारताच्या उभारणीसाठी तंबाखूसेवन सोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे म्हणूनच सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातल्याचे पंतप्रधान म्हणाले.

#BHARAT KI LAXMI द्वारे आपल्या मुलींच्या यशोगाथा ठळकपणे मांडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.