पुणे- नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

Students
Share this News:

पुणे दि. 01 : पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील एरंडवणा, येरवडा, औंध, बोपोडी (खडकी), पर्वती (सहकारनगर, मुंकुदनगर), दत्तवाडी, वानवडी, घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशव नगर, शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, बिबवेवाडी (मार्केटयार्ड, गुलटेकडी) पुणे शहर व सर्व पेठा. या भागातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. त्यांनी त्यांची माहिती [email protected] या Email id वर पाठवावी. तसेच हवेली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील बाणेर, कोंढवा, धनकवडी, बालाजी नगर, सिंहगड रोड, धायरी, विश्रांतवाडी चंदननगर, हडपसर, मांजरी, कोथरूड, बालेवाडी, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती [email protected] या Email id वर पाठवावी.

तसेच मुळशी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील पाषाण, सुस, वाकड हिंजवडी, बावधन इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती [email protected] या Email id वर पाठवावी.

माहिती पाठविताना संपूर्ण नाव , सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर व्यवसाय –विद्यार्थी/ कामगार/नोकरी/अन्य- त्याचा पत्ता, मूळ गावचा पत्ता- गाव, तालुका, जिल्हा, राज्य, प्रवास कसा करणार आहात- स्वत:चे वाहन/सार्वजनिक वाहन, किती लोक प्रवास करणार याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.