Marathi Movie Chalu Dya Tumcha Music Launched

Share this News:

एखाद्या वाईट गोष्टीचा शोक करण्याऐवजी त्याकडे विनोदी अंगाने पाहिलं तर जगणं अधिक सोपं होतं असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. आनंदी जीवन जगण्यासाठी हसण्यासारखं दुसरं टॉनिक नाही.चित्रपटांच्या माध्यमातूनही हे टॉनिक वेगवेगळी प्रेक्षकांना मिळत असल्याने विनोदी चित्रपटांचा हंगाम कधीच संपत नाही. ब्लू व्हिजन एंटरटेनमेंट्स च्या बेनरखाली तयार झालेल्या ‘चालू द्या तुमचं’ हाआगामी मराठी चित्रपट म्हणजे जणू आनंदी जीवनाचं टॉनिकच आहे. प्रवीण मधुकर तायडे, विशाल वसंत वाहूरवाघ आणि अमोल वसू यांनी ‘चालू द्या तुमचं’ या चित्रपटाची निर्मिती केली असून राजेशबाळकृष्ण जाधव यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच अंधेरीतील हॉटेल फ्लॅगमध्ये मोठया थाटात संपन्न झाला. या सोहळयाला चित्रपटातीलकलाकारतंत्र् ाज्ञ-गायक-संगीतकारांसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर मंडळीही उपस्थित होती.

गीतकार अविनाश घोडके, हनुमंत येवले आणि आदिती जहागीरदार यांनी या चित्रपटासाठी गीत लेखन केलं आहे. त्यावर मधू भोसले आणि अनुराग-चिन्मय यांनी स्वरसाज चढवला आहे. कथानकाला गतीप्रदान करणारी विविध मूड्समधील चार वेगवेगळी सुमधूर गाणी ही या चित्रपटाची खासियत आहे. यापैकी ‘‘दस का डझन पाँच का आधा…’’ हे गीत विजय गटलेवार, मुकूंद नितोणे आणि विभावरी यांनीगायलं आहे, तर ‘‘20-20 खेळ…’’ हे गीत उत्तरा केळकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. ‘‘मन माझे हरवून बसले…’’ हे द्वंद्वगीत विजय गटलेवार आणि नेहा राजपाल यांनी गायलं आहे. ‘‘चालू द्या तुमचं…’’ या शीर्षकगीताला आदर्श शिंदेने आपला भारदस्त आवाज दिला आहे. गणेश सातर्डेकर यांनी या गीताचं संगीतसंयोजन केलं आहे. नॉस्टेल्जिया स्टुडिओ आणि आजीवासन स्टुडिओ येथेया गाण्यांचं ध्वनीमुद्रण करण्यात आलं आहे. अवधूत वाडकर यांनी शीर्षकगीताचं साऊंड मिक्सिंग केलं आहे. ‘चालू द्या तुमचं’ हा सिनेमा जगण्याकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याचा संदेश देणारा आहे. मनोरंजनासोबतच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. ग्लोबलायझेशनची झळ आज शहरासोबतच खेडयांनाही बसू लागली आहे. या गदारोळात माणूस आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत हेचविसरू लागला आहे हे या चित्रपटात पाहायला मिळेल. काही स्वार्था व्यक्ती समाजाहितोपयोगी गोष्टी करण्याऐवजी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी समाजाचं अतोनात नुकसान करीत आहेत. अशा व्यक्तींनापरावृत्त करणारी कथा या चित्रपटात अत्यंत मार्मिकपणे सादर करण्यात आली आहे. दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनीच ‘चालू द्या तुमचं’ची कथा-पटकथा लिहिली आहे. संभाजी सावंत यांनीसंवादलेखनाची जबाबदारी पार पाडली आहे. मिलिंद गुणाजी, विजय कदम, संदिप पाठक, निशा परूळेकर, मेघा घाडगे, अजय जाधव, उमेश मितकरी, वैशाली चांदोरकर, सुधीर सिन्हा, दिपज्योती नाईक, कमल आदिब आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असून विजय पाटकर, जयराज नायर, राहुल तायडे, मीरा जोशी यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका वठवली आहे. संतोष भोसले यांनीरंगभूषा, मनाली भोसले यांनी केशभूषा, तर मीनल भास्कर देसाई यांनी वेशभूषा केली आहे. केशव ठाकूर यांनी कलादिग्दर्शनाचं काम पाहिलं असून, प्रशांत नाईक यांनी या चित्रपटातील साहसदृश्यांचंदिग्दर्शन केलं आहे. दिपाली विचारे, जयेश पाटील आणि भरत जाधव यांनी ‘चालू द्या तुमचं’मधील गीतांची कोरिओग्राफी केली आहे. सुदर्शन सातपुते यांनी संकलन केलं असून, छायांकन राजा फडतरे यांचंआहे. प्रविण शशिकांत जगताप निर्मिती प्रमुख आहेत, तर महेश गोपाळ भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.