नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

Share this News:

पुणे, दि. ७ जानेवारी २०२० : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लानी आज असंख्य कुस्ती शौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत शैलेश शेळकेला अर्थातच उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला मित्र व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आज सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही चांदीची मानाची गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली.

खासदार श्रीनिवास पाटील आणि श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अमनोराचे अनिरुद्ध देशपांडे, माजी खासदार अशोक मोहोळ, सुनील शेळके, नानासाहेब नवले आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तसेच यावेळी आगामी कुस्तीवरील ‘केसरी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या चित्रपटातील कलाकार प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर व अभिनेता विराट मडके तसेच दिग्दर्शक सुजय डहाके उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहेत. अशा मल्लांना व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

पवार पुढे म्हणाले, यंदाची कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रची शान आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पैलवान तयार होतात. केसरीच्या गदा कोण पटकविणार हे कालपर्यंत जे वाटत होते, त्यांचा सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला आहे. दोन नवीन मल्ल यासाठी पुढे आलेले असून हीच खरी कुस्तीची किमया आहे. यंदाच्या नेटक्या आयोजनाचेदेखील पवारांनी कौतुक केले.

बाळासाहेब लांडगे म्हणाले, आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून कुस्तीसाठी एकत्र आले पाहिजे. आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुढे कशी नेता येईल याचा विचार केला पाहिजे.

स्पर्धेतील सर्वसाधारण सांघिक विजेतेपद

माती विभाग

सोलापूर जिल्हा (गुण- १९०)

उपविजेतेपद पुणे जिल्हा (गुण- ८८)

गादी विभाग

सोलापूर जिल्हा (गुण- १७३)

उपविजेतापद कोल्हापूर (गुण- १३८)

अंतिम निकाल –

९७ किलो गादी विभाग

सुवर्ण – विकास सुळ (सातारा) (१५-८)

रौप्य – सूरज मुलानी (सोलापूर)

कांस्य – अरुण बोंगार्डे (कोल्हापूर शहर) विरुद्ध कृष्णत कांबळे (कोल्हापूर जिल्हा) (५-०)

कांस्य – अक्षय गरुड (मुंबई पूर्व) विरुद्ध महेश भोसले (मुंबई पश्चिम) (६-३)

९७ किलो माती विभाग

सुवर्ण – विशाल बनकर (सोलापूर जिल्हा) (चितपट)

रौप्य – सारंग सोनटक्के (मुंबई उपनगर)

कांस्य – दीपक कराड (लातूर)

७९ किलो माती विभाग

सुवर्ण- हणमंत पुरी (उस्मानाबाद)

रौप्य – सागर चौगुले (सोलापूर जिल्हा )

कांस्य- धर्मा शिंदे (नाशिक)

५७ किलो वजनी गट माती विभाग

सुवर्ण – आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)

रौप्य- संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)

कांस्य – ओंकार लाड (कोल्हापूर जिल्हा )

७९ किलो गादी विभाग

सुवर्ण- रामचंद्र कांबळे (सोलापूर)

रौप्य – रविंद्र खैरे (उस्मानाबाद)

कांस्य- केवल भिंगारे (अहमदनगर)

कांस्य – श्रीधर मुळीक (सातारा)

५७ किलो वजनी गट गादी विभाग

सुवर्ण – ज्योतिबा अटकळे (सोलापूर)

रौप्य- रमेश इंगवले (कोल्हापूर)

कांस्य – आतिष तोडकर (बीड)

कांस्य – संकेत ठाकुर (पुणे शहर)

६१ किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – सागर मारकड (पुणे जिल्हा)

रौप्य – निखिल कदम (पुणे शहर)

कांस्य- हनुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा)

७० किलो माती विभाग

सुवर्ण- नितिन पवार (कोल्हापूर शहर)

रौप्य – मच्छिंद्र निवंगरे (कोल्हापूर जिल्हा)

कांस्य- संतोष गावडे (सोलापूर)

८६ किलो वजनी गट माती विभाग

सुवर्ण – प्रशांत जगताप (सोलापूर)

रौप्य- आकाश भिंगारे (अहमदनगर)

कांस्य – संतोष पडळकर (पुणे)

७० किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – कालीचरण सोलनकर (सोलापूर जि.)

रौप्य – दिनेश मोकाशी (पुणे जि.)

कांस्य – विकास गोरे (अहमदनगर)

कांस्य – योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड)

८६ किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – वेताळ शेळके (सोलापूर जि.)

रौप्य – बाबासाहेब चव्हाण (जालना)

कांस्य – हर्षल गवते (धुळे)

९२ किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – शुभम चव्हाण (सोलापूर जि.)

रौप्य – जयदीप गायकवड (सातारा)

कांस्य – अमोल मुंढे (बीड)

७४ किलो माती विभाग

सुवर्ण- अनिल चव्हाण (कोल्हापूर)

रौप्य – आबासाहेब मदने (सोलापूर जिल्हा)

कांस्य- श्रीकांत निकम (सांगली)

६१ किलो गादी गट –

सुवर्ण – विजय पाटील, कोल्हापूर

रौप्य – सागर बरडे, नाशिक जिल्हा

कांस्य – अनुदान चव्हाण, पुणे शहर

कांस्य – सौरभ पाटील, कोल्हापूर शहर

७४ किलो गादी गट –

सुवर्ण – कुमार शेलार, कोल्हापूर जिल्हा

रौप्य – स्वप्निल काशीद, सोलापूर शहर

कांस्य – अमित सुळ, सोलापूर

कांस्य – राकेश तांबूटकर, कोल्हापूर

६५ किलो गादी गट –

सुवर्ण – अक्षय हिरगुड, कोल्हापूर

रौप्य – देवानंद पवार, लातूर

कांस्य – भालचंद्र कुंभार, पुणे शहर

कांस्य – भाऊराव सदगिर, नाशिक जिल्हा

९२ किलो गादी गट –

सुवर्ण – पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर जिल्हा

रौप्य – प्रसाद सस्ते, पिंपरी चिंचवड

कांस्य – भैरव माने, सोलापूर

कांस्य – सागर मोहोळ, पुणे शहर

Follow Punekar News: