टाॅवर लाईनच्या कामासाठी गुरुवारी बारामती तालुक्यामध्ये वीजपुरवठा बंद

electric
Share this News:

बारामती, दि. 22 जानेवारी 2020 : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून जाणारी महापारेषण कंपनीची 220 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या कामासाठी व त्या ठिकाणी असलेली अतिउच्चदाब टाॅवर लाईन हटविण्याच्या पूर्वनियोजित कामासाठी गुरुवारी (दि. 23) सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बारामती शहर, एमआयडीसी व तालुक्याच्या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

महापारेषण कंपनीची जेजुरी ते बारामती ही 220 केव्ही टाॅवर लाईन बारामती एमआयडीसीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून जात असल्याने ती भूमिगत करण्याचे काम सुरु आहे. तसेच त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली अतिउच्चदाब 220 केव्ही टाॅवर लाईन काढून टाकण्यात येत आहे. या दोन्ही कामांसाठी महापारेषणकडून गुरुवारी (दि. 23) सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बारामती 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल. पर्यायाने या उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा देखील बंद राहणार आहे. त्यामुळे बारामती शहर, बारामती तालुक्याचा ग्रामीण, एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापारेषण व महावितरणकडून करण्यात आली आहे.