केपजेमिनी कंपनीच्या वतीने सॅनिटायझर व पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द

पुणे दि.30:- केपजेमिनी लिमिटेड या फ्रान्स स्थित कंपनीच्या वतीने 1 हजार 400 पीपीई किट आणि 500 लिटर सॅनिटायझर मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.

या कंपनीची पुण्यात हिंजवडी, तळवडे आणि मगरपट्टा येथे कार्यालये असून कंपनीच्या वतीने आणखी आयआर थर्मामीटर आणि 1 हजार फेस शिल्ड तसेच व्हेंटिलेटरची मदत देखील जिल्हा प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

Support Our Journalism Contribute Now