पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोजित केला पहिला जनता दरबार

Share this News:

5 July 2019 : सत्ता आणि प्रशासन हे सर्वसामान्यांच्या हितासाठी समर्पित आहे या धारणेने राज्यात मंत्रीपदाचा कार्यभार चालवीत असलेले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.

सांस्कृतिक राजधानी आणि सामाजिक एकोप्याची नगरी असलेल्या पुण्यातील विविध संस्था, संघटनांनी विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रणे दिली. आणि काही समस्या आणि सुविधांबाबत तक्रारीदेखील करण्यात आल्या. मात्र त्यांची तातडीने दखल घेत उपस्थित अधिकारी वर्गा मार्फत पुढील कार्यवाहीचे नियोजन देखील करण्यात येत होते.

महापौर मुक्ता टिळक, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक आदीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.