भोसरीत इफ्तार पार्टी उत्साहात; हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती
सामाजिक सलोख्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम
पिंपरी, 25 मे – मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त आमदार महेशदादा स्पोट्र्स फांऊडेशन, मित्र परिवार आणि पिंपरी-चिंचवड शहर मुस्लीम महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.
भोसरीतील इंद्रायणी मंगल कार्यालयात आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, चिखलीचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, एमआयडीसीचे राजेंद्र कुटे, निगडीचे सतिश पवार, दिघीचे विवेक लांवड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईझान काझी, मुस्लिम महासंघाचे अजहर सिकंदर खान, फारुक ईनामदार, जहिर सिकिलकर, अस्लम पठाण, हाजी गुलामरसुल सय्यद, हबिबभाई शेख, खाजाभाई शेख, फय्याज सनदी यांच्यासह भोसरीतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ”सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी यांसारख्या उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाज नेहमीच माझ्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. माझ्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हा समाज यापुढे देखील माझ्या पाठिशी ठामपणे उभा राहिल याची मला खात्री आहे. माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या. तुमच्या अडी-अडचणीला मी धावून येईल. तुमच्या सुख दु:खात मी नेहमीच सहभागी असेल”.
भाईझान काझी म्हणाले, आमदार महेश लांडगे नेहमीच मुस्लीम समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. रमजानमध्ये महेश लांडगे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. मुस्लीम समाजाच्या हितासाठी ते नेहमीच काम करतील. विलास मडिगेरी, सीमा सावळे यांनी मुस्लीम बांधवांना पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या संयोजनात आमदार पै. महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशन मित्र परिवार व पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम महासंघाच्या सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला.