वडगाव शेरीतून उषा बाजपेयी इच्छुक
पुणे, 3/9/2019 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. वडगाव शेरी मधून इच्छुक उमेदवारीमध्ये उषा बाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरला आहे. बाजपेयी या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत सहभागी असून, कारिगर राष्ट्रीय भाजपा महिला मोर्चाच्या संयोजिका आहेत.
वडगांव शेरी भागातून भाजपा उमेदवारीसाठी उषा बाजपेयी, जगदीश मुळीक, राजेश लोकरे, महेंद्र गलांडे, संजय पवार इच्छुक आहेत.
‘या निवडणुकीत मोदी सरकार कोणत्या निकषांवर उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी निकषात कौटुंबिक वारसा न घेता इतरांना संधी देण्याचा भाजपा सरकारने निर्णय घेतला आहे. महिला आरक्षण तसेच महिला सबलीकरण, महिला उद्योजिकीकरण कार्यातील माझा सातत्याने सहभाग या निकषांवर पक्ष नक्कीच लक्ष देईल.
मी २०१२ मध्ये देखील निवडणूक लढवली आहे. यंदा लोकसहभाग आणि मागणी नुसार मी अर्ज भरला आहे, अशी माहिती उषा बाजपेयी यांनी दिली.
उषा बाजपेयी यांच्या कार्याविषयी
उषा बाजपेयी यांनी अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजू महिलांना मदत करण्याचे कार्य केले आहे. ‘कलाकृती’ च्या बॅनरखाली हस्तकला उद्योग करून इच्छुक महिलांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी उत्तम व्यासपीठ म्हणून कार्य करत आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ (पुणे शहर) संयोजिका म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली. तसेच महिला आयोगच्या वतीने महिला बचत गट संयोजिका आहेत. के सी एल ए .स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली २० वर्षे त्या महिला सशक्तीकरणासाठी काम करतात. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी उभे राहण्यास आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी शिक्षित करण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी अनेक गरजू आणि व्यावसायिक महिलांना मुद्रा लोन मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘उज्ज्वला’, ‘स्किल इंडिया’, ‘आयुष्यमान भारत’ सारख्या योजनांच्या प्रसार कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. फ्रेंड्स ऑफ बीजेपी च्या सह समन्वयक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, ‘वारी नारीशक्ती` दिंडी उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवराना आमंत्रीत करणे या नियोजनाची जबाबदारी पार पाडली.
उषा वाजपेयी या शिक्षण व माध्यम संशोधन केंद्र (ईएमआरसी) पुणे विद्यापीठ येथे माध्यम संशोधक होत्या. बाजपेयी राष्ट्रीय महिला मोर्चा, भाजपाच्या राष्ट्रीय संयोजिका पदावर कार्यरत आहेत.
Attachments area