युक्रांदच्या स्थापनादिनानिमित्त रक्तदान शिबिरात 100 जणांचे रक्तदान

Share this News:
पुणे(कोथरूड):
युवक क्रांती दलाच्या स्थापना दिनानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात  100 युवकांनी  रक्तदान  केले .  रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड , जेष्ठ समाज सेवक अन्वर राजन,प्रवीण सप्तर्षी ,सेक्रेटरी संदीप बर्वे, अप्पा अनारसे, रवी लाटे, युक्रांद पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
” पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनीया अशा प्रकारचे रोग पसरतात. येत्या काळात लोक आजारी पडले  तर, त्यांना रक्ताची खूप गरज भासेल. त्यासाठी युक्रांदने जे हे शिबीर घेतले आहे ते खूप मोलाचे काम आहे. रक्ताचे नाते ट्रस्ट आणि युक्रांद गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत काम करत आहे. युक्रांदची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. युक्रांदचे युवक कायम आम्हाला साथ देत असतात. त्यासाठी त्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा आहेत ” अअसे बांगड म्हणाले. 

यावेळी युक्रांद शहर अध्यक्ष सचिन पांडुळे म्हणाले, “पुण्यासारख्या शहरात रक्ताचा नेहमी तुटवडा भासतो. रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना, रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. त्यामुळे युक्रांद गेल्या कित्येक वर्षांपासून आपला स्थापना दिन रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करतो. आम्ही युक्रांदीय कार्यकर्ते जात, धर्म मानत नाहीत. फक्त मानवतेला आमचे प्रधान्य असते. संत गाडगेबाबांच्या विचारांना मानतो. त्यामुळेच ज्याला युक्रांदचे सदस्य व्हायचे असेल  त्यांनी रक्तदान करावे,अशी आमची संकल्पना आहे.”

 

रक्तदान शिबिरात युक्रांदचे कार्यकर्ते ऋतुजा पुकळे, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले,अतुल नंदा, क्रांती माने,ओंकार आमटे, जय दहिफळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.