शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी योगसाधना सर्वोत्तम – सचिन तालेवार

Share this News:

पुणे, दि. 21 जून 2019 : अत्यंत धकाधकीच्या विद्युत क्षेत्रात काम करताना स्वतःची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी दररोज योगसाधना करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी शुक्रवारी (दि. 21) केले.

 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महावितरणच्या वतीने रास्तापेठ येथील सभागृहात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता तालेवार बोलत होते. यावेळी महावितरणचे कर्मचारी व योग प्रशिक्षण  सुरेश जाधव यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्व, फायदे सांगितले व प्रशिक्षण सुद्धा दिले. योग प्रशिक्षणाच्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता  सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता  वादिराज जहागिरदार, सहाय्यक महाव्यवस्थापक राजेंद्र म्हकांळे,माधुरी राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींंद्र बुंदेले, मधुकर घुमे, बाळासाहेब हळनोर, संजीव नेहेते, प्रणाली विश्लेषक  मोहन कोळेकर आदींसह कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.