च-होली फाट्याचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण

Share this News:

भोसरी, 18 सप्टेंबर – आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील च-होलीत विकासकामांचा धडाका सुरु आहे. पठारे मळा येथील प्राईड सिटीवरुन लोहगाव विमानतळाकडे जाणा-या 18 मीटर रंदीकरणाच्या मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. तसेच च-होली फाट्याचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे.

त्याचबरोबर च-होली गावठाणातील भोई आळी येथे स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून च-होलीतील भोई आळी येथील श्री प्रतापेश्वर मित्र मंडळ या नवीन व्यायामशाळेचे भूमीपूजन देखील आज करण्यात आले.

नागरिकांच्या मागणीनुसार पुणे-आळंदी रोडवरील च-होली फाटा येथील चौकाचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (बुधवारी) नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

पुणे-आळंदी रोडवरील च-होली फाटा येथील चौकाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे नाव देण्याची मागणी च-होलीतील शिवप्रेमी नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. आमदार लांडगे यांनी महापालिकेतील अधिका-यांना चौकाचे नामकरण करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार चौकाचे नामकरण करण्यात आले आहे. नामकरण फलकाचे आमदार लांडगे यांच्या हस्ते अनावरण झाले.

यावेळी माजी महापौर नितीन काळजे, सौ सुवर्णा विकास बुर्डे सभापती ई नगरसेविका श्री सचिनभाऊ तापकीर संजुभाऊ तिकोणे शातांराम तापकीर अक्षय तापकीर, पिराजी काशिद, संतोष पठारे, गणेश तापकीर, प्रशांत तापकीर, अजित बुर्डे, अभिषेक तिकोणे, संतोष पठारे, कुंडलिक तापकीर, अनिकेत तापकीर, सतीश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.