गायन, हार्मोनियम, तबला वादनातून ‘गुरुवंदना’

Share this News:
पुणे, 29/8/2019 : स्वरसंपदा संगीत अकादमीच्या वतीने गुरुवंदना या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विजय तेंडूलकर आॅडिटोरियम, राजीव गांधी इर्निंग स्कूल, शिवदर्शन चौक येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमात श्रोत्यांना वयवर्षे ५ ते ४५ या वयोगटातील विविध कलाकारांचे गायन, हार्मोनियम, तबला वादन अनुभवायला मिळणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती अकादमीच्या संपदा वाळवेकर यांनी दिली.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार होणे आणि ते नवीन पिढीने आत्मसात करणे, हा मुख्य उद्देश ठेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वयवर्षे ७ ते १० मधील मुले शास्त्रीय संगीत सादर करणार असून तीन विद्यार्थ्यांचे हार्मोनियम एकलवादन आणि चार विद्यार्थ्यांचे एकत्रित तबला वादन हे कार्यक्रमाचे वैशिष्टय असणार आहे. नवोदित कलाकार व विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे, याकरीता असे कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.