महानगरपालिकेचे स्वच्छता सैनिक, परगावचे विद्यार्थी, पोलीस यांच्यासाठी मोफत भोजन सेवा

Share this News:

पुणे २०/०३/२०२० : संपूर्ण देश कोरोना विरूध्दची लढाई संयमाने आणि स्वयंशिस्तीने लढतोय. दुकाने, हॉटेल्स उस्फूर्तपणे बंद आहेत. पण या परिस्थितीत अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडलेले नागरिक, हातावर पोट असलेले समाजबांधव, परगावचे विध्यार्थी आणि मुख्यत्वे आपले स्वच्छता सैनिक यांचे खाण्याचे हाल होऊ नयेत म्हणून वंदेमातरम् संघटना, सरहद काश्मिरी विद्यार्थी संघटना, श्री गुरुगौतममुनी मेडिकल ॲन्ड चॅरिटेबल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील काही दिवस दररोज पाच हजार गरजूंना दुपारच्या व संध्याकाळच्या दुपारी साडेबारा ते दोन तसेच संध्याकाळी साडेसात ते नऊ जेवणासाठी फुड पॅकेटस देण्यात येणार आहेत.

पुणे शहरातील विविध पंधरा ठिकाणी हे फुड पॅकेटस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे शहराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाल्याची काश्मिरी विद्यार्थ्यांची भावना आहे. तर आपले स्वच्छतादूत, डॉक्टरर्स, सरकारी रुग्णालयांमधील कर्मचारी यांच्या बद्दल कृतीरुपी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंदेमातरम् संघटना, सरहद आणि श्री गुरु गौतममुनी मेडीकल ॲन्ड चॅरिटेबल सेंटर यांनी सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे.

भोजनव्यवस्था सेंटर्स पुढील प्रमाणे १) लक्ष्मी रोड. सचिन जामगे ९९२१६९३१७५२) ज्ञानेश्वर पादुका चौक एफसी रोड नयन जोशी ७७११९९३९९९३) आनंदनगर संतोष हॉल नितीन जाधव ९८२२९१९२३२४) पूना मर्चंट मार्केट यार्ड गणेश चोरडिया ९३७३७३७९९९५) शारदा सेंटर नॉळस्टॉप एरंडवणा तेजस वाशिवले ९६६५६००३९८६) दांडेकर पूल रामकृष्ण मठ किरण केकाने आदित्य मुंगळे ८४११९९१०४४७) एस पी कॉलेज टिळक रोड अनिष पाडेकर गणेश देशपांडे ९८२२२३९७९० /९८६०४१४१९२८) शुक्रवार पेठ हॉटेल दुनियादारी चिंचेची तालीम जवळ जगदीश ९०७९६२५९२७९) सारसबाग गणपती मंदिरासमोर प्रशांत नरवडे अक्षय आवारे ८८०५५०५५०० / ९५९५०९२२२५१०) सरहद स्कूल ऑफ कात्रज अकिब भट ९८२२०३४४३७११) जैन मंदिर चौक नाईक हॉस्पिटल गुरुवार पेठ रोहन पोळ ९८८११०१६४०१२) शनिवार वाडा गंधार करडे ओमकार वडके ९०२२२६९५२१/७०६६१२२९४८
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२१६९३१७५ / ९२७०९४२८३५ / ९०११५५६०१५ / ८६००२०२०३०/ ९८५०९०४०३७
वेळ दुपारी.१२:३० ते २संध्याकाळी .७ ते ९

तरी *योग्य आणि गरजू नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहचवूया, करोनो विरुध्दची लढाई एकदिलाने लढूयात