सांगलीतील पूरग्रस्तांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटे रवाना

पुणे, दिनांक 9- सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि ‘रेडी टू इट’ असे खाद्यपदार्थ पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर आणि सांगली साठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी राम यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिरुर येथून सांगलीतील पूरग्रस्तांसाठी 12 हजार लिटर पाण्याच्या बाटल्या (एक ट्रक) आणि बिस्कीटांचे पुडे (एक ट्रक) रवाना करण्यात आले.
यासाठी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे तसेच त्यांच्या सहका-यांनी पुढाकार घेतला.या दोन्ही ट्रकना विभागीय आयुक्तांच्या परवानगीने टोलमधून सूट देण्यात आली आहे.