विद्यार्थ्यांनी शिक्षणातून राष्ट्रनिर्मिती करावी- आमदार विजय काळे यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांकडून आई-वडील व समाजाच्याही मोठ्या अपेक्षा असतात त्यामुळे त्यांनी जबाबदारी ओळखून स्वतःच्या पायावर उभे रहात कुटुंबाचे नाव कमवावे यातूनच राष्ट्रनिर्मिती होते असे आवाहन आमदार विजय काळे यांनी केले.
नगरसेविका निलीमा खाडे यांच्या वतीने प्रभाग क‘मांक 24 मधील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेविका निलीमा खाडे, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय खाडे, माजी महापौर नाना नाशिककर, नगरसेवक उदय जोशी, शिवाजीनगर अध्यक्ष सतिश बहिरट, शिवाजीनगर युवा मोर्चा अध्यक्ष अपुर्व खाडे, प्रभाग अध्यक्ष नितीन कोर, नाना मोरे, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले की, राज्यसरकार व केंद्रसरकारकडून समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना असतात त्यांचाही लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांच्या हातून चांगले नागरिक म्हणून आईवडीलांना अभिमान वाटेल असेच कार्य घडावे नोकरी, धंदा, व्यवसायासाठी तुमच्या कर्तत्वाचाला कष्टाची जोड द्या असे आवाहनही काळे यांनी केले.